संस्थेचे उपक्रम
अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या श्री विट्ठल रुक्मिणी मंदिरात दैनंदिन कीर्तन होते. त्याचसोबत अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमही होत असतात. ही संस्था म्हणजे दादर परिसरातील सर्व भक्तांना मोठा आधारच असून येथील धार्मिक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक आणि मनाला विरंगुळा देणारे कार्यक्रम या मंदिरात चालत असल्यामुळे ते दादरकरांचे प्रमुख सांस्कृतिक व सामाजिक केंद्र झाले आहे.

धार्मिक कार्यक्रम



चैत्रगौर
चैत्र महिन्यात मंदिरात गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो व यावेळी उपस्थितांना आंब्याची डाळ व पन्हे देण्यात येते.


वटपौर्णिमा
दरवर्षी मंदिरात वटपौर्णिमेनिमित्त सामुदायिक वटपूजनाचे आयोजन केले जाते व यावेळी सुमारे १२५-१५० महिला सहभागी होतात.


तुलसी विवाह
एखाद्या मोठ्या लग्न समारंभाप्रमाणे मंदिरात पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाह साजरा केला जातो. यावेळेस संपूर्ण मंदिर सजवले जाते व विवाहाचे सर्व सोपस्कार केले जातात.


महालक्ष्मी पूजन
नवरात्रातील अष्टमीला सकाळी नवचंडी यज्ञाचे आयोजन केले जाते व रात्री घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होतो.


विजयादशमी अर्थात दसरा
या दिवशी सायंकाळी शमीपूजन करून सोने लुटण्याचा कार्यक्रम असतो.


गुढीपूजन सोहळा
चैत्र शुद्ध प्रतिपदेला श्री विट्ठल मंदिरात गुढीपूजन केले जाते व हिंदू नववर्षाचा पहिला दिवस साजरा केला जातो. हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या नववर्ष स्वागत यात्रेत सुरुवातीपासूनच सहभाग. समितीच्या बैठका. संस्थेचे अधिकारी स्वागतयात्रेत सहभागी होतात.


गंगापूजन
एखादा दिवस निश्चित करून त्यावेळेस महिला घरून गंगाजल घेऊन येतात व त्याचे सार्वजनिक पूजन मंदिरात केले जाते. यावेळेस विविध महिला भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम किंवा माजी विद्यार्थ्यांची कीर्तने आयोजित केली जातात.


हरितालिका पूजन
गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी हरितालिका व्रत केले जाते. विट्ठलमंदिरात सामूदायिक स्वरुपात हरितालिका पूजनाचे आयोजन केले जाते व सुमारे १००-१२५ महिला या पूजेत सहभागी होतात.


अन्नकोट
बलिप्रतिपदेच्या दिवशी सुमारे ४० पदार्थांचा विट्ठलाला नैवेद्य दाखवला जातो. अतिशय देखणी आरासही केली जाते. भक्तगण दिवाळीचा फराळ घेऊन येतात. फराळ आणि नैवेद्याचे पदार्थ प्रसाद म्हणून उपस्थितांना वाटण्यात येतात.


आषाढी व कार्तिकी एकादशी
विट्ठलाचे दोन प्रमुख उत्सव म्हणजे आषाढी व कार्तिकी एकादशी. या वेळी संपूर्ण महाराष्ट्रच विट्ठल नामात दंग झालेला असतो. या वेळेस मंदिरही फुलांनी सजवले जाते. पहाटेपासूनच भक्तांची विठ्ठलदर्शनासाठी रांग लागलेली असते. दिवसभरात सुमारे पाच हजार भाविक विठ्ठलदर्शनासाठी मंदिरात येतात. दिव्यांग शाळेतील विद्यार्थी, लहान वयाचे विद्यार्थी, आबालवृद्ध वारीला साजेशी वेशभूषा करून दिंडी घेऊन दर्शनाला येतात.


नवरात्रोत्सव
शारदीय नवरात्रात घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत सामूहिक श्रीसुक्त पठण होते व आरती केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसात राष्ट्र सेविका समिती, अखिल भारतीय कीर्तन संस्था व दादरमधील अन्य काही सहयोगी संस्था आरतीचे आयोजन करतात. त्याचप्रमाणे जनजाती/सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो.


श्री ज्ञानेश्वरी सप्ताह
गेली – वर्षे विट्ठल मंदिरात हा उपक्रम सुरू आहे. सुरुवातीच्या काळात दासबोध मंडळाद्वारे हा उपक्रम चालवला जात असे. मात्र गेल्या – वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातूनच हा उपक्रम होतो. साधारण सुमारे ६० भक्तगण ज्ञानेश्वरी वाचन करतात तर सुमारे १०० भक्तगण श्रवणासाठी येतात.


दासनवमी उत्सव
दासनवमी उत्सवाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक व दासबोध सप्तक या पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सुमारे ४० – ५० शाळांचे सुमारे सातशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. याच काळात दासबोध पठणाचेही आयोजन करण्यात येते. दररोज सुमारे ५० भक्त पारायण करतात तर तेवढेच श्रवण करण्यासाठी येतात.
संस्थेतून घडलेले नामांकित कीर्तनकार
- करवीर पीठाचे आदरणीय शंकराचार्य विद्यानृसिंह भारती
- माजी मुख्यमंत्री कै.मनोहर जोशी
- ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक किरण शांताराम
- ज्येष्ठ समीक्षक कै.डॉ.अशोक दा. रानडे
- कालनिर्णयकार कै.जयंत साळगावकर
- माजी शिक्षणमंत्री कै.सुधीर जोशी
- सुप्रसिद्ध व्याख्याते कै.प्रा.राम शेवाळकर
विविध उपक्रम
- राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मातृदिन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमातील दृश्य
- मसुराश्रमाचे ब्रह्मचारी विश्वनाथ महाराज मार्गदर्शन करताना
- बालकीर्तनकार कु. ज्योत्स्ना गाडगीळ हिची मुलाखत घेताना डॉ. समीरा गुजर
- कीर्तन वर्गात मार्गदर्शन करताना प्रा. श.शं. उत्पात
- संस्थेतील कीर्तन वर्गाचा बक्षीस समारंभ

