laavaunaI ma&du/ga MautaI oaL GaaeVa ! saevaU baXhmarsa AavaDInae!!

hrIcyaa kItaQnae Sauk AaiNa naard CeidtaI AiBamaanaacaa k/du!

gaataa/ paE/ naacataa/ AKa/D paE/ wlhasa kItaQnaI/ paXemaalhadu!!

MavaNa/ kItaQnae ivaVNaae: smarNa/ paadsaevanama! AcaQna/ vandna/ dasya/ saKyamaatmainavaednama!!

अखिल भारतीय कीर्तन संस्था

अखिल भारतीय कीर्तन संस्थेची स्थापना १९४० रोजी दादर येथे झाली. कीर्तन या विद्येच्या प्रचार व प्रसारार्थ एखादी संस्था असावी या विचारातून ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला व कै. शंकरराव कुलकर्णी व कै. गोविंद भोसेकर यांच्या पुढाकाराने या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. गेली अनेक दशके ही संस्था तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून कीर्तन प्रशिक्षणाचे वर्ग चालवीत आहे. कीर्तनाच्या दूरस्थ अभ्यासक्रमाचा सर्वदूर प्रसार व प्रचार करणे, विविध ठिकाणी कीर्तन महोत्सव भरवणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.

इतिहास

कीर्तन शिका

कीर्तन म्हणजे ईश्वराचा नामघोष करणे. प्राचीन काळापासून कीर्तन परंपरेचा उपयोग मनोरंजन, लोकशिक्षण, धर्मशिक्षण आणि तत्वज्ञानाचा प्रचार यासाठी केला गेला आहे. देवर्षी नारद हे आद्य कीर्तनकार समजले जातात. संत ज्ञानेश्वरांपासून ते गाडगे महाराजांपर्यंत अनेक समाजसुधारकांनी याच लोककलेचा प्रभावी उपयोग केला. अखिल भारतीय कीर्तन संस्थेने याच परंपरेचा उज्ज्वल वारसा पुढे नेण्याचे असिधारा व्रत स्वीकारले आहे. त्यातूनच नारदीय पद्धतीच्या कीर्तनाचे पदविका व दूरस्थ अभ्यासक्रम या संस्थेकडून चालविले जातात. यासाठी वय, लिंग, जात किंवा व्यवसाय अशी कोणतीही अट नाही. आपणही या अभ्यासक्रमासाठी जरूर प्रवेश घ्या.

संस्थेचे उपक्रम

गुढीपूजन सोहळा

चैत्रगौर

गंगापूजन

वटपौर्णिमा

आषाढी व कार्तिकी एकादशी

हरितालिका पूजन

सहयोग द्या!

अखिल भारतीय कीर्तन संस्था ही मुंबईतील एक प्रसिद्ध संस्था आहे. गेली सुमारे ८५ वर्षे कीर्तनकारांच्या अनेक पिढ्या घडवण्याचे कार्य ही संस्था नेटाने करीत आली आहे. दादर येथील एक महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र असणाऱ्या विठ्ठल मंदिरातही नित्य-नैमित्तिक असे अनेक उपक्रम पार पडत असतात. दादर परिसरातील भक्तांना या मंदिराच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक, धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा लाभ घेता येतो. या उपक्रमांसह वैद्यकीय शिबिरे, ग्रंथालय असेही अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून नियमितपणे आयोजित केले जातात. आपल्यासारख्या दातृत्वशील मंडळींच्या बळावरच हे सर्व घडते आहे. तरी आपले आर्थिक सहकार्य या कार्याच्या प्रभावी संचालनासाठी आवश्यक आहे.
“अखिल भारतीय कीर्तन संस्थेला समर्थन द्या आणि आमची समृद्ध सांस्कृतिक धरोहर संरक्षित करण्यात मदत करा !”