श्री विट्ठल – रखुमाई मंदिरात दररोज (रविवार व्यक्तिरिक्त) नियमित कीर्तनसेवा असते. अनेक मान्यवर आपली कीर्तन सेवा रुजू करतात.
विशेष आख्याने
श्री विट्ठल – रखुमाई मंदिरात गेली अनेक वर्षे विविध नैमित्तिक कीर्तनांचे आयोजन केले जाते. यात श्रीराम नवमी, श्री दत्त जयंती, श्री हनुमान जयंती, श्रीकृष्ण जयंती अशी सर्व जन्माची कीर्तने मंदिरात होतात व त्याला भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते.
भजन वर्ग
श्री विट्ठल – रखुमाई मंदिरात भजनाचे वर्ग भरतात. भजनसेवा करणाऱ्या विविध समुहांचा या वर्गाच्या आयोजनात सहभाग असतो. त्याचप्रमाणे सुगम संगीताचेही वर्ग संस्थेत भरतात.
बाल संस्कार वर्ग
श्री विट्ठल – रखुमाई मंदिरात लहान मुलांसाठी संस्कार वर्ग चालवले जातात. यालाही चांगला प्रतिसाद मिळतो.