ग्रंथालय

अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अत्यंत सुसज्ज व दुर्मीळ ग्रंथांचे ग्रंथालय दादर येथील संस्थेच्या इमारतीत आहे. आध्यात्मिक, वैचारिक आणि सामाजिक अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील तब्बल ३५०० हजार पुस्तके या ग्रंथालयात आहेत. ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांवरील भाष्य, संतचरित्रे, संतसाहित्य, संतसाहित्यावरील भाष्ये, नारदीय कीर्तने, पुराणे, धार्मिक ग्रंथ, संशोधनपर संदर्भ ग्रंथ अशा विविधांगी साहित्याचा या ग्रंथालयात समावेश आहे. कीर्तन अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी तसेच सर्वसामान्य वाचक या सर्वांसाठी ग्रंथालयाची सुविधा संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदीकृत वाचकांना पंधरा दिवसांसाठी पुस्तक दिले जाते. दूरस्थ कीर्तन अभ्यासकांसाठी एक महिन्याची सुविधा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकरिता ग्रंथालयात वाचनकक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.