ज्येष्ठ कीर्तनकारांचा सन्मान

कीर्तनकार हे समाजात प्रबोधनकाराची भूमिका बजावत असतात. संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकारांचा सन्मान केला गेला आहे. विशेषतः नारदीय कीर्तनपरंपरा जपणाऱ्या कीर्तनकारांना प्राधान्याने हा मान मिळतो. संस्थेच्या वर्धापनदिनी अर्थात श्रावण वद्य पंचमीला हा कार्यक्रम संपन्न होतो. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, पदवी आणि रोख राशी असे या सन्मानाचे स्वरूप असते. वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प.कै.श्रीकृष्ण महाराज (नाशिक), वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प.वासुदेवबुवा प्रकाशकर (मुंबई), कीर्तन चंद्रिका ह.भ.प.कै.पद्मावतीबाई काळे (डोंबिवली), ह.भ.प. कै. शंकरबुवा काळे (भिवंडी) अशा अनेक सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ कीर्तनकारांना यापूर्वी संस्थेने सन्मानित केले आहे. याच दिवशी तृतीय वर्ष उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ कीर्तनकारांच्या हस्ते सन्मान केला जातो. ज्यांचा सन्मान केला जातो, त्यांची कीर्तनसेवाही असते.