विठ्ठल मंदिर सभागृह
विवाहसोहळा, साखरपुडा, बारसे, डोहाळेजेवण तसेच अन्य घरगुती कार्यक्रम, त्याचप्रमाणे स्नेहसंमेलने, बैठका, छोट्या सभा यासाठी आपल्याला सभागृहाची आवश्यकता असते. या सर्व कार्यक्रमासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे सभागृह विठ्ठल मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सभागृहाची क्षमता १२० खुर्च्यांची असून वातानुकुलित अर्थात एसी व नॉन एसी अशा दोन्ही स्वरुपात या हॉलचे बुकिंग करता येते. त्यामुळे आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या स्लॉटमध्ये सभागृह भाड्याने घेता येते. सभागृह नोंदणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. या सभागृहाला केटरिंगची मोनोपॉली नाही. केटरिंगची सोय संबंधितांनी करावयाची आहे.

सभागृह नोंदणी

वेळ भाडे देणगी एकूण अनामत
(परतावायोग्य अनामत )
सकाळी ६ ते रात्री ९ वा. ९००० /- रू. १२००० /- रू. २१००० /- रू. १०००० /- रू.
सकाळी ६ ते दुपारी ३ वा. ९००० /- रू. ३००० /- रू. १२००० /- रू. ८००० /- रू.
दुपारी १२ ते रात्री ९ वा. ९००० /- रू. ३००० /- रू. १२००० /- रू. ८००० /- रू.
संध्याकाळी ४ ते रात्री ९ वा. ८००० /- रू. ८००० /- रू.

४००० /- रू.

सभागृहातील सुविधा

१२० खुर्च्या

एसी
(एसी वापरासाठी वरील तक्त्यातील भाड्याव्यतिरिक्त प्रति तास १५००/- रू. प्रमाणे अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.)

तिसऱ्या मजल्यावर भोजनकक्ष व किचनची सोय.

धार्मिक कार्याकरिता पुरोहित
(पुरोहितांची दक्षिणा प्रत्येक कार्यानुसार वेगळी असते. ग्राहकांनी त्याबद्दल खातरजमा करणे आवश्यक राहील.)

सादरीकरणासाठी प्रोजेक्टर
(यासाठी कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.)

त्वरित नोंदणी करा

    त्वरित नोंदणी करा

    ग्रंथालय

    अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अत्यंत सुसज्ज व दुर्मीळ ग्रंथांचे ग्रंथालय दादर येथील संस्थेच्या इमारतीत आहे. आध्यात्मिक, वैचारिक आणि सामाजिक अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील तब्बल ३५०० हजार पुस्तके या ग्रंथालयात आहेत. ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांवरील भाष्य, संतचरित्रे, संतसाहित्य, संतसाहित्यावरील भाष्ये, नारदीय कीर्तने, पुराणे, धार्मिक ग्रंथ, संशोधनपर संदर्भ ग्रंथ अशा विविधांगी साहित्याचा या ग्रंथालयात समावेश आहे. कीर्तन अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी तसेच सर्वसामान्य वाचक या सर्वांसाठी ग्रंथालयाची सुविधा संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदीकृत वाचकांना पंधरा दिवसांसाठी पुस्तक दिले जाते. दूरस्थ कीर्तन अभ्यासकांसाठी एक महिन्याची सुविधा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकरिता ग्रंथालयात वाचनकक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
    सभासदत्व शुल्क