सहयोग द्या
अखिल भारतीय कीर्तन संस्था ही मुंबईतील एक प्रसिद्ध संस्था आहे. गेली ८० वर्षे कीर्तनकारांच्या अनेक पिढ्या घडवण्याचे कार्य ही संस्था नेटाने करत आली आहे. या प्रशिक्षणवर्गांच्या माध्यमातून अनेक कीर्तनकार तयार झाले व समाजाचे प्रबोधन करण्याचे कार्य करत आहेत. दादर येथील एक महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र असणाऱ्या विठ्ठल मंदिरातही नित्य नैमित्तिक असे अनेक उपक्रम पार पडत असतात. दादर परिसरातील भक्तांना या मंदिराच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक, धार्मिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचा लाभ घेता येतो. या उपक्रमांसह वैद्यकीय शिबिरे, ग्रंथालय असेही उपक्रम होतात. भविष्यातही अशा अनेक उपक्रमांचा लाभ आपल्याला घेता येणार आहे.
कोणतीही समाजसेवी व बहुआयामी संस्था चालवायची तर त्याकरिता आर्थिक तरतूदही तितकीच महत्त्वाची असते. अखिल भारतीय कीर्तन संस्थाही याला अपवाद नाही. संस्थेतील विविध सांस्कृतिक-सामाजिक तसेच अन्य उपक्रम, येथील एकूण व्यवस्थापन याकरिता आपल्या आर्थिक मदतीचे स्वागत आहे. खाली दिलेल्या लिंकच्या आधारे वा थेट संपर्क करून आपण यात खारीचा वाटा उचलू शकता.