आमच्याविषयी
अखिल भारतीय कीर्तन संस्थेची स्थापना १९४० रोजी दादर येथे झाली. कीर्तन या विद्येच्या प्रचार व प्रसारार्थ एखादी संस्था असावी या विचारातून ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला व कै. शंकरराव कुलकर्णी व कै. गोविंद भोसेकर यांच्या पुढाकाराने या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. गेली अनेक दशके ही संस्था तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून कीर्तन प्रशिक्षणाचे वर्ग चालवीत आहे. कीर्तनाच्या दूरस्थ अभ्यासक्रमाचा सर्वदूर प्रसार व प्रचार करणे, विविध ठिकाणी कीर्तन महोत्सव भरवणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.
संस्थेच्या स्थापनेला ८० हून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. पत्र्याच्या शेडमध्ये स्थापन झालेल्या विठ्ठल मंदिरात सुरू झालेल्या संस्थेची प्रगती वेळोवेळी होत गेली व आज एका दुमजली सुसज्ज इमारतीत तिचे रुपांतर झाले आहे. १९६० साली संस्था भाड्याने वापरत असलेला जागा विकत घेऊन तेथे इमारत बांधण्यात आली. पुढे १९६९ साली कामाचा दुसऱ्या मजल्यावर एक सभागृह बांधण्यात आले. आज संस्थेची तीन मजली इमारत दिमाखात उभी आहे. संस्थेच्या तळमजल्यावर श्रीविठ्ठलाचे मंदिर आहे. पहिल्या मजल्यावर सुसज्ज धार्मिक ग्रंथालय व कीर्तन प्रशिक्षण वर्ग, दुसऱ्या मजल्यावर कै. कमलाबाई जोशी सभागृह आणि तिसऱ्या मजल्यावर मंगल कार्याच्या व्यवस्थेच्या दृष्टीने राखीव खोल्या व किचन हे संस्थेच्या सध्याच्या वास्तूचे स्वरुप आहे. कीर्तन अभ्यासक्रमासह भजन, सुगमसंगीत व पौरोहित्य याचेही प्रशिक्षणवर्ग दरम्यानच्या काळात सुरू झाले. सन २००० साली संस्थेच्या वास्तूचे पुनर्निर्माण झाले. सन २००१ मध्ये कीर्तन विद्यालयाचे नामकरण ” साई सत्चरीत्रकार हेमाडपंत कीर्तन विद्यालय ” असे करण्यात आले.
संस्थेचे आद्य संस्थापक
- कै.शं.ब.कुळकर्णी
- कै.ह.भ.प.गो.ग.भोसेकर

पहिले कार्यकारी मंडळ एप्रिल १९४४ ते मार्च १९४९
- कै. डॉ. दा. शि. मुणगेकर
- कै. कृ. वि. केळकर
- कै. वि. श्री. पारखी

आमचे स्फूर्तीस्थान
- कै. श्री. सुरेश उपाध्ये
विद्यमान कार्यकारी मंडळ (एप्रिल २०२२ ते मार्च २०२५)
क्र | नाव | दायित्व | व्यावसायिक पार्श्वभूमी |
---|---|---|---|
१ | श्री. माधव विष्णु खरे | अध्यक्ष | बँकर |
२ | श्री. विठ्ठल दाजी परब | उपाध्यक्ष | निवृत्त |
३ | श्री.किशोर जगदीश साठे | कार्यवाह | व्यावसायिक |
४ | सौ. सविता प्रदीप भट | संयुक्त कार्यवाह | गृहिणी |
५ | श्री. प्रसन्न अशोक जोशी | संयुक्त कार्यवाह | नोकरी |
६ | श्री. गजानन पेंडसे | कोषाध्यक्ष | नोकरी |
७ | श्री. सुभाष वामन दाबके | सदस्य | निवृत्त |
८ | श्रीमती शुभदा शशिकांत लिमये | सदस्य | गृहिणी |
९ | श्रीमती आरती सत्यनाथ पाठारे | सदस्य | गृहिणी |
१० | श्रीमती रेखा वसंत बिवलकर | सदस्य | गृहिणी |
११ | श्रीमती शालिनी शशिकांत रिसबुड | सदस्य | गृहिणी |
१२ | श्री निलेश विठ्ठल परब | सदस्य | नोकरी |
१३ | श्री सुनिल मनोहर केळकर | सदस्य | नोकरी |
१४ | श्री प्रणव राजीव भोंदे | सदस्य | पत्रकार |
१५ | श्री वसंत मार्तंड बोकील | सदस्य | निवृत्त |
१६ | श्री रवींद्र अरुण मेणकूरकर | सदस्य | व्यावसायिक |
१७ | श्री सुनील अनंत बर्वे | सदस्य | सामाजिक कार्यकर्ते |