कीर्तन शिका
देवर्षी नारद हे आद्य कीर्तनकार मानले जातात. महाराष्ट्रातील नारदीय कीर्तन परंपरा ही थेट महानुभाव संप्रदायाच्या काळापासून सुरू असल्याचे पुरावे मिळतात. वारकरी संप्रदायाने देखील महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेत मोलाचे योगदान दिले आहे. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील आद्य कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. पुढे अनेक संतांनी कीर्तनातून समाजप्रबोधनाचे आणि ज्ञानप्रसाराचे कार्य सुरू ठेवले. हाच वसा ‘अखिल भारतीय कीर्तन संस्था’ आपल्या कीर्तन महाविद्यालयाच्या माध्यमातून पुढे नेत आहे. ८० हून अधिक वर्षे कीर्तन प्रशिक्षणाचे कार्य नियमितपणे सुरू आहे. दरवर्षी ताज्या दमाचे कीर्तनकार या संस्थेतून प्रशिक्षित होऊन बाहेर पडतात. कीर्तनकार तयार करणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे कीर्तन विद्यालयात दिले जाणारे कीर्तन प्रशिक्षण हा या संस्थेच्या कार्याचा कणाच आहे. मुंबईसारख्या महानगरात अद्यापही अखिल भारतीय कीर्तन संस्था हीच एकमेव कीर्तन प्रशिक्षण देणारी संस्था असल्यामुळे या संस्थेतून अलंकृत होणाऱ्या विद्यार्थ्यांना कीर्तनसेवेसाठी विशेष मागणी असते. दूरस्थ पद्धतीनेही हे प्रशिक्षण घेण्याची सोय संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.
शैक्षणिक अर्हता (कोण प्रवेश घेऊ शकते ?)
- कीर्तन शिकण्यासाठी कोणत्याही जातीची, पंथांची अगर लिंगाची अट नाही.
- विद्यार्थ्यांचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे.
- विद्यार्थ्यांस भाषा आणि वाङ्मयाची आवड असावी.
- विद्यार्थ्यांस संगीताची आवड असावी.
कीर्तन प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा फायदा
- कीर्तनाचा वसा सुरू राहतो, शतकानुशतकांची परंपरा पुढे नेली जाते.
- सादरीकरण कला आत्मसात होते.
- जनप्रबोधनाची जबाबदारी पार पाडता येते.
सध्याचे कीर्तन अभ्यासक्रमाचे स्वरुप – ३ वर्षांचा अभ्यासक्रम

कीर्तन प्रशिक्षण अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
गायन, पारंपरिक प्रात्यक्षिकांची माहिती, तज्ज्ञ कीर्तनकारांच्या माध्यमातून मार्गदर्शन

अभ्यासाचे माध्यम(भाषा)
मराठी

अभ्यासक्रम
संतवाङ्मय, आर्या साकी दिंडी आदी वृत्त, भारतीय संगीतातील विविध राग-ताल यांची तोंडओळख (दर तीन वर्षांनी अभ्यासक्रम बदलतो)

कालावधी
३ वर्षे, ६ सत्रे

शैक्षणिक वर्ष
जून ते एप्रिल

अभ्यासक्रमाचे स्वरूप
सैद्धांतिक व प्रात्यक्षिक

परीक्षांचे स्वरूप
एकूण ६ परीक्षा, प्रत्येक वर्षात २

गुणांकनाचे स्वरूप
एकूण गुण १०० (लेखी ४० + प्रात्यक्षिक ६०)
आठवड्यातून दोन वेळा संध्याकाळी ६ ते ८:३० संस्थेत कीर्तन वर्ग

दूरस्थ अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्य
अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या माध्यमातून मुंबईबाहेरील विद्यार्थ्यांकरिता तसेच ज्यांना वेळेअभावी, नोकरी-व्यवसायामुळे प्रत्यक्ष कीर्तन वर्गांना येणे शक्य नाही अशांकरिता दूरस्थ पद्धतीने कीर्तन वर्गाचे आयोजन केले जाते. यासाठी अर्हतेचे निकष व अभ्यासक्रम नियमित वर्गांप्रमाणेच असून यात प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी दादर येथे संस्थेत सध्या महिन्यातून एका रविवारी कीर्तनवर्गाचे केले जाते. अनेक अनुभवी व मान्यवर कीर्तनकारांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. दूरस्थ अभ्यासक्रमासाठी संस्थेची १२ केंद्रे कार्यरत आहेत.
दूरस्थ अभ्यासक्रमाची केंद्रे :
- दादर, मुंबई
- आकेरी – सिंधुदुर्ग
- चिपळूण
- रत्नागिरी
- पनवेल
- पुणे
- डोंबिवली
- नेरळ
- पाली
- अकोला
- धुळे
- मिरज
- नाशिक
- अलिबाग
- बोरीवली
दूरस्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लिंक
प्रवेशासाठी खाली दिलेला अर्ज करा
प्रवेशासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा